जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊमध्ये एका वृध्द महिलेची अत्यावश्यक औषधे घरपोच पोहचवणारे पोलीस हवालदार सुहास पोवार हे लोकांच्या कौतुकास पात्र ठरलेले आहेत.
श्री. सुहास पोवार
पोलीस हवालदार , जुना राजवाडा पोलीस ठाणे
कोल्हापूर
सलाम त्यांच्या माणुसकीला…!
पूर्ण देश थांबलेला, राज्य बंदी, जिल्हाबंदी लागू झालेली, घराबाहेर जाण्यासाठी परवानगी नाही. त्यात एका वुद्ध महिलेची अत्यावश्यक औषधे संपतात जी परजिल्ह्यातून आणायची.औषधी न मिळाल्याने ती माऊली अस्वस्थ, रात्रीची झोप लागेना, हातपाय ताठरु लागलेले, अशा परिस्थितीत औषधी घरपोच पोहचविणारा वर्दीतला देवमाणूस त्या महिलेने अनुभवला. ते म्हणजे पोलीस हवालदार सुहास पोवार.
एके दिवशी एक वृद्ध महिला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आली. चालता येत नसल्याने आपल्या १६ वर्षाच्या पोटच्या पोराचा आधार घेऊन. जिल्हा सोडण्यास परवानगी नसल्याने तिला दुसर्या जिल्ह्यातुन औषधी मागविता येत नव्हती. त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. तिची ही परिस्थिती पोलीस हवालदार सुहास पोवार यांच्याकडून बघवली नाही. तुम्ही घरी जा,औषधी तुम्हाला घरपोच करतो असे वचन त्यांनी त्या माउलीला दिले.
त्यानंतर त्यांनी मिरज येथील त्या डॉक्टरांचा पत्ता व औषधींचा चिट्ठीचा फोटो घेतला. तो फोटो त्यांनी सांगलीतील आपल्या भावास पाठवून त्या औषधी मागवून घेतल्या. त्यानंतर जेव्हा ते औषधी देण्यास त्या महिलेच्या घरी गेले पोहचले तेव्हा साहेब तुम्हीच परमेश्वर … खाकीतही मी देवमाणूस पाहिला असे शब्द त्या महिलेच्या तोंडून निघाले व तिने त्यांचे आभार मानले.
सलाम सुहास पोवार व अश्या सर्व पोलिसांना जे जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावतांना माणुसकीही जिवंत ठेवत आहेत.
( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )
अधिक माहितीसाठी
फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers