जळगाव । नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद येथील नागनाथ दमकोंडवार हे एखाद्या सैनिकाप्रमाणे कोविडचा प्रतिकार करण्यासाठी लढत असून यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
श्री. नागनाथ दमकोंडवार
आरोग्य सेवक,
मुक्रमाबाद, जि . नांदेड
सलाम त्यांच्या जिद्दीला !
मुक्रमाबाद नांदेड जिल्ह्यातील एक गाव. लोकसंख्या दहा ते बारा हजार, तरीही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला ७ जुलैला. आतापर्यंत पॉझिटीव्ह रुग्णसंख्या मात्र ४३. त्यातही ६ ऑगस्ट पासून आतापर्यंत एकही रुग्ण नाही. देशभरात कोरोनाचे रोज नवीन रेकॉर्ड बनत असतांना आपल्या गावात रुग्णसंख्या मात्र ४३ वर थांबविण्याची कामगिरी करणारे आरोग्य सेवक म्हणजे श्री. नागनाथ दमकोंडवार.
साथीरोग होऊ न देण्यासाठी असणार्या प्रतिबंधात्मक उपाययोजना विभागाचे कर्मचारी आहेत नागनाथ दमकोंडवार. कोरोना पूर्ण देशभर पसरायला सुरुवात झाली परंतु दमकोंडवारानी मुक्रमाबादेत कोरोनाचा प्रसार न होऊ देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी कर्नाटक-महाराष्ट्र बॉर्डरवर असलेल्या गावात ड्युटी केली. बाहेरगावावरून येणार्या प्रत्येक नागरिकाला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्याची माहिती वरील कार्यालयात पोहचविली. ते रोज सकाळी ६ ते रात्री ८पर्यंत तेथे थांबुन असत.
पॉझिटीव्ह पेशंट आढळल्यास त्याला रुग्णालयापर्यंत पाठविण्याची व्यवस्था ते करत होते. तसेच त्या पेशंटच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करून त्यांच्यावरही लक्ष ठेवत.गरज वाटल्यास त्यांना रुग्णालयात पाठवत. त्यांनी केलेल्या या उपाययोजनेमुळे ६ ऑगस्टनंतर आतापर्यंत तेथे एकही रुग्ण आढळलेले नाही तसेच रुग्णसंख्या ४३ वर थांबवण्यात त्यांना यश आले आहे. हे सगळे करत असतांना त्यांची टीम सदस्यांची संख्या मात्र ५ होती हे विशेष.
रुग्णांच्या सेवेसाठी ते मुख्यालयात पूर्ण परिवारासह वास्तव्यास होते.ज्यात दोन लहान मुलींचाही समावेश आहे. रात्री- बेरात्री कॉल आल्यास ते त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी धावून जातात. त्यांना त्यांच्या या सेवेबद्दल विचारले तेव्हा १३ वर्षांच्या नोकरीत आता कुठे या सेवेतून समाधान मिळतेय. त्यामुळे रात्री झोपही चांगली येते. असे ते सांगतात. पुढे बोलतांना जसे सैनिक देशसेवेसाठी सीमेवर लढून देश सेवा करताहेत तसेच देशसेवेत योगदान देण्याचे भाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे असे ते म्हणतात.
सलाम श्री. नागनाथ दमकोंडवार व त्यांच्यासारख्या सर्व आरोग्य सेवकांना जे रुग्णसेवेच्या माध्यमातून देशसेवा करत आहेत.
( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )
अधिक माहितीसाठी
फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers