चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे हे त्वरित मागे घेण्यात यावे, यासाठी सुरू असलेला किसान आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शहरात अखिल भारतीय काँग्रेस पक्षांकडून भारत बंदचे आयोजन करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर कायदे अस्तित्वात आणले आहे. त्यामुळे हे काळे कायदे शेतकरी विरोधात असल्याने ते तातडीने मागे घेण्यात यावे म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र हे काळे कायदे त्वरित रद्द कराव्यात यासाठी चाळीसगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व सेवादल तर्फे भारत बंदचे आयोजन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले. यावेळी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. सदर आंदोलणाप्रसंगी महिला अध्यक्षा सुवर्णा पोळ, तालुका अध्यक्ष अनिल निकम, सेवादल अध्यक्ष आर. डी. चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, राहुल मोरे, रविंद्र पोळ, रविंद्र जाधव,अलताफ खान जमशेर खान, प्रदिप देशमुख, प्रा.एम. एम. पाटील, आर.जे. पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, धनंजय चव्हाण, नितीन पाटील, शिवलाल साबणे, सुमनबाई मोची, अजय पोलडीया, देविदास खरटमल, बापू चौधरी, लताबाई पगारे, लताबाई वाणी, मंदाताई सूर्यवंशी, सुमनबाई मोची, पुजा मोची व सुमनबाई नंगवारे आदी उपस्थित होते.