पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी मंगळवारी रात्री पुण्यातील नवी पेठे व शास्त्री रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात घोषणा बाजी केली. येत्या २५ ऑगस्टला एमपीएससी तर्फे कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी तसेच नियोजनत स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी परीक्षार्थ्यांनी मंगळवारी रात्री शास्त्री रस्ता येथे आंदोलन केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत, पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी आयबीपीएसची परीक्षा आहे. एमपीएससीने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे.
एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही येणाऱ्या रविवारी २५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी केली आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून मिळाले नव्हते. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये करता आला नाही. मात्र, मुलांनी या परीक्षेची तयारी केली असल्याने कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकर करण्यात येईल असे देखील आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची देखील परीक्षा आहे. यामुळे आयोगाने २५८ पदांचा सवावेश करण्यासोबतच ही २५ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी मुलांनी आक्रमक भूमिका घेत शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी आयोगाविरोधात घोषणा बाजी देखील केली.