भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरात आरटीओ कार्यालय व आदिवासी प्रकल्पाचे उपकार्यालय हावे या मागणीसाठी शुक्रवारी सर्वपक्षीय त्रस्त नागरिकांनी एकत्र येत भडगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले.
प्रस्तावित आरटीओ कार्यालय व यावल येथील आदिवासी प्रकल्पाचे उपकार्यालय भडगाव येथे व्हावे, या मागणीसाठी अगोदर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत एकजुटीने लढा देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले होते., तसेच २३ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे काम सुरु झाले. भडगाव येथे प्रस्तावित आरटीओ कार्यालय चाळीसगाव येथे हलविण्यात आल्याच्या चर्चेने भडगाव तालुक्यात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे, या दोन्ही मागण्यांसाठी एकत्र लढा देण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी दोघेही कार्यालय व्हावे याबाबत घोषणा देण्यात आल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असे यावेळी आंदोलनकर्त्यांनतर्फे सांगण्यात आले.यावेळी समस्त भडगाव तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी व सर्वच राजकीय पक्षांच्या पदधिकारी यांनी सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले.