धरणगाव (प्रतिनिधी) येथे थोर समाजसुधारक स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची १४३ वी जयंती मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. तसेच नगरपालिकेतर्फे प्रशासकीय इमारत सभागृहातील कार्यक्रमात प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी संत गाडगे महाराज याचा प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी भाजपा गटनेते कैलास माळी व माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी गाडगेबाबा यांचा स्वच्छता संदेश घरोघरी पोहचवा असे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थित चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विजय महाजन, नूतन विकास सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन धीरेंद्र पुरभे, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, विलास महाजन, नंदू पाटिल, परिट समाजचे प्रांत सदस्य छोटू जाधव, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विनोद रोकडे, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, अशोक जाधव, गणेश जाधव, विलास जाधव, भूषण जाधव, कन्हैया रायपुरकर, बंटी महाजन, बालू जाधव, न.पा. कर्मचारी प्रणव पाटील, चौधरी, भाऊसाहेब नारायण माळी, जयेश महाजन व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.