गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात रास-दांडिया उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात रास-दांडिया 2023 उत्साहात पार पडला.  महाविद्यालयाच्या आवारात रॉक गार्डन मध्ये संध्याकाळी रास-दांडिया घेण्यात आला.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची सुरवात देवीच्या प्रतिमेस पुष्पहार, श्रीफळ अर्पण करून केली. उपस्थितांना संबोधताना त्यांनी सांगितले की हिंदू धर्मात नवरात्र महोत्सवास खूप महत्वाचे स्थान आहे. सांस्कृतिक कार्यक्रम हे आपल्या संस्कृती सोबत जोडतात. दांडिया, गरबा हे आपल्या भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. अभ्यासासोबत सांस्कृतिक उपक्रम सुद्धा महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यानी यामध्ये भाग घेतला पाहिजे. नवरात्रीत सर्वत्र आनंद, उत्साह दिसून येतो. देवीच्या शक्तीरूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते. जसे देवीने तिच्या शक्तीचे दर्शन घडविले आहे तसेच सामर्थ्य, शक्ती आपल्या ठायी निर्माण झाली पाहिजे जेणेकरून जीवनात प्रत्येक संकटावर मात देता येईल.

 

सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या बी.बी.ए, बी.सी.ए, एम.बी.ए, एम.सी.ए च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर गरब्याच्या ताली खेळल्या.

यावेळी दांडिया किंग विश्वजित पाटील, दांडिया क्वीन भूमिका नाले, बेस्ट ड्रेस चेतन थोरात,  हर्षा माळी, गरबा किंग प्रणव रायसिंग, गरबा क्वीन मनस्वी परदेशी, या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये बक्षिसे पटकावली.

 

सर्व स्पर्धांसाठी परिक्षकांचे काम महाविद्यालयाच्या प्रा. स्मिता चौधरी व प्रा. प्राजक्ता पाटील यांनी पाहिले. सदर कार्यक्रमास डॉ.निलिमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content