सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । चॉकलेटचे आमीष दाखवून दोन बालिकांवर अत्याचार करणार्या अरूण यशवंत मेढे उर्फ डॉक्टरबाबा या नराधमास सावदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील गाते येथील अरूण यशवंत मेढे उर्फ डॉक्टरबाबा याने सुमारे सहा दिवसांपूर्वी गाते येथील एका सात वर्षीय बालिकेस चॉकलेटचे आमीष दाखवून आपल्या घरी बोलावले. यानंतर त्याने मोबाईलमध्ये अश्लील क्लीप दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्या बालिकेने आपल्या आईला याची माहिती २९ रोजी दिली. यावरून संबंधीत महिलेने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता यशवंत मेढे याने गेल्या महिन्यात याच बालिकेच्या समवयीन मैत्रीणीवरही याच प्रकारे अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या मुळे सावदा पोलिसांनी अरूण यशवंत मेढे उर्फ डॉक्टरबाबा याच्या विरूध्द भादंवि ३७६ (२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३,४,५, (एल)(एम), ६, ११(३), १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.