रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजी रँपिड अँक्शन फोर्सने शहरातून पथ संचालन केले.
येथील पोलीस ठाण्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, उटखेडा रोड, संभाजी नगर, बंडू , इमामडा, चावडी भाग, कोतवाल वाडा, नागझिरी रोड, रसलपूर , महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कारागीर नगर, बारी वाडा, भोई वाडा, गांधी चौक, डॉ. हेडगेवार चौक मार्गे पथसंचलन करण्यात आले.
यावेळी शिघ्र कृती दलाचे जवान, आर सीपी जवान, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान या पथसंचलनात सहभागी झाले होते. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, रॅपीड अॅक्शन फोर्सचे डेप्यूटी कमांडर शशिकांत रॉय, असि.कमांडर संतोष यादव, इन्स्पेक्टर जी.एस.झारिया, सब. इनस्पेक्टर अजयकुमार सिंग, रामचंद्र पाटील, पोलीस फौजदार मनोहर जाधव, सचिन नवले, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.