धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निशाने गावातील एका भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेसोबत अश्लिल कृत्य करत विनयभंग केल्याची खळबळजनक घटना रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली होती. याप्रकरणी सायंकाळी साडेपाच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील निशाने गावात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील देविदास तुळशीराम भील याची विवाहितेवर वाईट नजर होती. दरम्यान, रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता विवाहिता घरी एकटी असतांना संशयित आरोपी देविदास भील हा घरात घुसला. यावेळी विवाहितेसोबत अश्लिल कृत्य करून अंगलट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर तो घटनस्थळाहून पसार झाला. पिडीत विवाहितेने सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देविदास भिल याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ३५५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहे.