बालिकेवर बलात्कार : नराधमास कठोर शिक्षा करण्याची मागणी (व्हिडीओ)


25bf12b9 719c 48fa a9df 6cc5e49edabd

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील एका नऊ वर्षीय बालिकेवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त गावकरी व समाज बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

भोई समाज युवा फौंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीडित मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तिचे वडील मोलमजुरी करतात. या घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरी आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात खटला चालवला जावून त्याला फाशीसारखी कठोर शिक्षा केली जावी. या आंदोलनाला जळगाव शहरातील शिवसेना पदाधिकारी व बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी पाठींबा दिला होता.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here