जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर एसआरपीएफ जवानाने दोन वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र करतार जाधव (रा.वसंतनगर, ता.पारोळा ह.मु.जळगाव) असे सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व जितेंद्र जाधव दोघही जळगाव शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्यात ओळख झाली. त्यातून मैत्री व त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१८ ते मे २०२१ या कालावधीत जितेंद्र याने जळगाव, अमरावती, पुणे व गुजरात मधील नडियाद याठिकाणी हॉटेल व लॉज मध्ये नेऊन वेळोवेळी अत्याचार केला. प्रत्येक वेळी लग्न करणार असे सांगत त्याने तरुणीला विश्वासात घेऊन शरीरसंबंध ठेवले. २ मे रोजी लग्न करण्याच्या तयारीने जितेंद्र जळगावात आला. यावेळी त्याने लग्नाला लागणारे काही साहित्य आणले होते म्हणून तो परत रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन गेला व तेथे त्याने पुन्हा त्यानंतर मूळ गावी वसंत नगर येथे गेला. तिथून आल्यानंतर लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पीडित तरुणीने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.