Home क्राईम लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार : समाजकल्याण सहाय्यक आयुक्तासह दोघांविरुद्ध गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार : समाजकल्याण सहाय्यक आयुक्तासह दोघांविरुद्ध गुन्हा


Rape2 678x381

जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांसह दोघांविरुद्ध रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

या संदर्भात अधिक असे की, पिडीत तरुणीने रामानंद पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्ता योगेश सुभाषराव पाटील यांनी लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आपल्यावर बलात्कार केला. तसेच पाटील यांच्या पत्नीने मारहाण केली. तर पाटील यांच्या वडिलांनी घरातून हाकलून लावले. या संदर्भात रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सचिन बेंद्रे हे करीत आहे.


Protected Content

Play sound