जातीवाचक शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिलगाव येथील महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना सोमवार ११ सप्टेंबर रोजी घडल्याची घटना घडली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गटारीतील कचरा काढण्याच्या कारणावरून जामनेर तालुक्यातील चिलगाव येथे एका ३९ वर्षीय महिलेला गावातील गोपाल सुरेश पाटील याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी  केली. तसेच महिलेला लज्जा उत्पन्न होईल कृत्य करत विनयभंग केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात घेवून तक्रार दिली. या तक्रारीवरून शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे करीत आहे.

 

Protected Content