Home क्राईम संतापजनक : अत्याचारातून गतीमंद तरूणी गर्भवती

संतापजनक : अत्याचारातून गतीमंद तरूणी गर्भवती


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गतीमंद असल्याचा गैरफायदा घेवून तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक घटना पारोळा तालुक्यात घडली आहे. एवढेच नाही तर अत्याचारातून पिडीत तरूणी गर्भवती राहिल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय गतीमंद तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या गावात राहणारा जीवन बापू पाटील हा तरूणी गतीमंद असल्याचा गैरफायदा घेवून गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, २० जून रोजी संशयित आरोपी हा पिडीत तरूणीसोबत अश्लिल कृत्य करत असतांना पिडीत तरूणीच्या मोठ्या बहिणीने बघितले. त्यानंतर संशयित आरोपी हा पसार झाला होता. गेल्या चार महिन्यांपासून गतीमंद तरूणीवर अत्याचार केल्याने गर्भवती राहिल्याचे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर समोर आले. पिडीत तरूणीच्या मोठी बहिणीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ७ जुलै रोजी रात्री ८ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जीवन बापू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नांदवाळकर करीत आहे.


Protected Content

Play sound