चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील सुंदरगढी येथे मागील भांडण्याच्या कारणावरून पतीसह पत्नीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३५ वर्षीय विवाहिता ह्या आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून त्यांच्या गल्लीत राहणारे मिलिंद उर्फ राजू इंदासे यांनी विवाहितेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान पतीला मारहाण होत असल्याचे पाहून विवाहितने मध्यस्थी केली. दरम्यान मध्यस्थी केल्याचा राग आल्यावरून मिलिंद उर्फ राजू इंदासे, सीमा महेंद्र इंदासे, दिपाली महिंद्र इंदासे आणि सुनंदा महेंद्र इंदासे यांनी विवाहितेला व तिच्या पतीला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. तसेच विवाहितेला असतील शिवीगाळ करून मारहाण केली आहे. या संदर्भात विवाहितेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मिलिंद उर्फ राजू इंदासे, सीमा महेंद्र इंदासे, दिपाली महेंद्र इंदासे आणि सुनंदा महेंद्र इंदासे यांच्यावर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.