मुंबई – आपल्या चुकीच्या वक्तव्यानंतर नेहमीच वादग्रस्त ठरणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विंग कमांडर अभिनंद वर्धमान यांना हेलिकॉप्टर पायलट म्हणून संबोधले आहे. विरोधाक त्यांच्या वाक्त्यावरून त्यांना घेरण्याची शक्याता आहे. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात एका सभेत बोलताना विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे आपल्या चुकीच्या आणि वादग्रस्त वक्तव्यांबाबत अधिक चर्चेत असतात. जवानांना अतिरेकी म्हणण्याचा पराक्रम केल्यानंतर विंग कमांडर अभिनंद वर्धमान यांना हेलिकॉप्टर पायलट बोलून रिकामे झाले आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवेंच्या चुकलेल्या संदर्भाचा ट्विटरवरून दानवेंचा चांगलाच समाचार घेतला. यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष अशा शब्दात त्यांनी दानवेंवर टीकास्त्र सोडले. ‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी गत आहे सगळी. असा खोचक टोमणाही त्यांनी मारला.
.