मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, ना. सुभाष देशमुख आदी नेते उपस्थित होते. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मानले जात आहे. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे तिकिट मिळू शकते.