नवी दिल्ली । केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान (वय ७४) हे गेल्या अनेक दिवसांपासून व्याधीग्रस्त असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हार्ट सर्जरी करण्यात आली होती. समाजवादी चळवळीतून पुढे आलेल्या पासवान यांनी प्रदीर्घ काळापर्यंत केंद्रीय मंत्रीमंडळात काम केले. राजकारणाची हवा पाहून आपली भूमिका बदलण्यासाठी ते ख्यात होते. बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर असतांना रामविलास पासवान यांचे झालेले निधन हे लोकजनशक्ती पक्षासाठी मोठा धक्का ठरले आहे. आता या पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या खांद्यावर आली आहे.