मुंबई प्रतिनिधी । विधानपरिषदेचे माजी उपसभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीदेखील राष्ट्रवादीला सोडण्याचे संकेत दिले आहेत. ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी अद्यापदेखील आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी निंबाळकर यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली. यातील झालेल्या चर्चेनुसार ते राष्ट्रवादीला सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते लवकरच शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.