चाळीसगाव (प्रतिनिधी) येथे लाईव्ह ट्रेन्ड चे प्रतिनिधी मुराद पटेल हे रमजान महिन्यात रोजा करणाऱ्या बांधवांना मोफत थंड पाणी पुरविण्याचे काम करीत असतात. त्यांच्या या अनोख्या सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुराद पटेल यांचा पाण्याचा कारखाना आहे. हा कारखाना रमजान महिन्यात रोजाचा उपवास करणाऱ्या सर्व बांधवांना खुला असतो. याद्वारे सर्वांना मोफत थंड पाणी पुरविले जाते. विशेष म्हणजे मुराद पटेल संध्याकाळच्या वेळी स्वतः परिवारासह हे पाणी वाटप करण्याचे काम करतात. यामुळे या परिसरातील रोजेकरांना मनापासून समाधान मिळत आहे.