बोदवड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेची बैठक नुकतीच बोदवड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली असून संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रमेश इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बैठकीचे औचित्य साधत संघटनेच्या बोदवड तालुका अध्यक्षपदाची धुरा नुकतीचं जलचक्र येथील पोलिस पाटील रमेश नारायण इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली.या निवडीबाबत चे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष नरेंदजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे जिल्हा सरचिटणीस गोपाळराव कौतिकराव पाटील यांनी नुकतेच त्यांना प्रदान केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संघटनेत उपाध्यक्ष म्हणून येवती येथील पोलिस पाटील, अर्चना यशवंत सावरीपगार, सचिव म्हणून शिरसाळे येथील पोलिस पाटील, संदीप बोरसे, सह सचिव म्हणून जलचक्र खु येथील पोलिस पाटील, वर्षा पाटील, महिला संघटक म्हणून वराड बु येथील पोलिस पाटील, अरुणा जगताप, तालुका संघटक म्हणून वरखेड खु येथील पोलिस पाटील पोलिस पाटील अशोक पाटील, कार्याध्यक्ष म्हणून मानमोडी येथील पोलिस पाटील, पवन पाटील, मार्गदर्शन म्हणून भानखेडा येथील पोलिस पाटील विठ्ठल पाटील, तालुका सल्लागार म्हणून चिखली बु येथील पोलिस पाटील प्रदिप वाघ, कार्यकारी सदस्य म्हणून शेवगे बु येथील पोलिस पाटील दिपक पाटील, प्रसिध्दी प्रमुख म्हणून उत्कर्षा पाटील यांचा या संघटनेत समावेश असून संबंधित पोलिस पाटील यांना पद व गोपनीयतेची शपथ दि.१३ सकाळी ११:०० देण्यात आली असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीबाबत पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोळी, मानमोडीचे आबा पाटील, सतिष पाटील, जगदीश कोळी, सचिन उगले यांसह उपस्थितांनी रमेश इंगळे यांना शाल व श्रीफळ देऊन यांचा सत्कार करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.