नवी दिल्ली । एकीकडे सरकार कोरोनाच्या लसीची तयारी करत असतांना योगगुरू बाबा रामदेव यांनी मात्र आपण कोरोनाची लस घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. ”कोरोनाचे कितीही अवतार येऊ देत.. योगावतार जिंदाबाद” असे म्हणत त्यांनी आपण ठणठणीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रामदेव म्हणाले, “मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की, मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला करोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे.”
करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याबद्दल रामदेव यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, “२०२१ मध्ये सर्वसामान्य लोकांना लस मिळणे अशक्य आहे. ही लस औषध नसून प्रतिबंधक लस आहे. मी लसीचा विरोध करत नाही पण अद्याप हे समोर आलेलं नाही की लस सहा महिन्यानंतर किती प्रतिकारशक्ती राखून ठेवते. मात्र, योगासनं केल्यास प्रतिकारशक्ती कायमच राखली जाईल.”
करोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी लस जरुर घ्यावी. बाकी जे सरकार आणि औषध कंपन्या करतील त्याचे परिणाम लवकरच समोर येतील आणि सर्वकाही चांगलं व्हावं, अशी माझी इच्छा आहे, असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.