पुणे । मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रामदास आठवले यांनी ‘गो करोना गो’, ‘गो करोना’ अशी घोषणा दिली होती. या घोषणेची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. आता ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेन संदर्भात रामदास आठवलेंनी ‘नो करोना’, ‘नो करोना’ अशी घोषणा दिली आहे.
राज्यसभा खासदार आणि अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज गो कोरोना गो स्लोगनवरून मोठा दावा केला आहे. तसेच नवीन स्लोगनची देखील घोषणा केली आहे. आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो… गो कोरोना… गो… असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आता या व्हिडीओनंतर आठवले यांनी आता ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेन संदर्भात रामदास आठवलेंनी ‘नो करोना’, ‘नो करोना’ अशी घोषणा दिली आहे.