कोळन्हावी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामकृष्ण सोळंके

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोळन्हावी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे रामकृष्ण सोळंके (शिरागड) तर व्हाईस चेअरमनपदी कैलास सोळंके (शिरागड) यांची निवड करण्यात आली आहे.

कोळन्हावी तालुका यावल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी संस्थेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी डी. जे. तडवी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली होती.

या बैठकीत चेअरमनपदासाठी भागवत दगा सोळंके व रामकृष्ण प्रकाश सोळंके यांचे प्रत्येकी दोन अर्ज चेअरमनपदासाठी दाखल करण्यात आले होते. यात मतदानाव्दारे निवडणुक संपन्न होवुन रामकृष्ण सोळंके यांना ८ मते तर भागवत सोळंके यांना पाच मते पडल्याने चेअरमनपदी रामकृष्ण सोळंके यांची तर व्हाईस चेअरमनपदी कैलास सोळंके यांची बिनविरोध निवड  करण्यात आली.

यावेळी संचालक संतोष सोळंके, विलास सोळंके, आधार सोळंके, अनिल सोळंके, मिराबाई सोळंके, विमल सोळंके, मच्छिद्र सोळंके, सोपान सोळंके उपस्थित होते. या संपुर्ण निवडणूक प्रक्रीयेत प्रशासक ए.टी.तायडे, सोसायटीचे सचिव श्यामकांत साळवे यांनी विशेष सहकार्य केले.

 

 

 

 

 

 

Protected Content