प्रयागराज वृत्तसंस्था । राम मंदिराबाबत न्यायालयीन लढाई सुरू असतांना आज प्रयागराज येथील धर्मसंसदेत मंदिराचे काम २१ फेबु्रवारीपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शंकराचार्य स्वरूपानंद यांनी प्रयागराज येथे धर्मसंसद बोलावली होती. यामध्ये राम मंदिराचे निर्माण कार्य हे २१ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. कालच केंद्र सरकारने विवादीत जागा वगळता दुसरी जागा ही राम मंदिर शिलान्यास समितीला देण्याची भूमिका न्यायालयात घेतली असून याबाबत निर्णय बाकी आहे. तथापि, एकीकडे न्यायालयात निर्णय प्रलंबीत असतांना दुसरीकडे धर्मसंसदेत राम मंदिर निर्माणाची तारीख जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.