अमळनेर प्रतिनिधी । आ. मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना अवमानकारक शब्द वापरल्याचा निषेध करण्यसाठी येथे महाविकास आघाडीने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.
आ. मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य काढल्याचा वाद आता चिघळल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आज अमळनेर शहरातही याचा निषेध करण्यात आला. मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात एकेरी शब्दात टिका केली म्हणून शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस महाआघाडीतर्फे त्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
शहरातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. महिला पदाधिकार्यांनी प्रतिकात्मक बॅनरला चप्पल जोडे मारून निषेध व्यक्त केला. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय पाटील, मनीषा परब, श्रीकांत पाटील, राष्ट्रवादीचे संजय पाटील, काँग्रेसचे हर्षल पाटील,राष्ट्वादी काँग्रेस शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, माजी अध्यक्ष बाळू पाटील, महेश देशमुख, नितीन निळे, नगरसेवक प्रताप शिंपी, उज्वला कदम, देवेन्द्र देशमुख, जीवन पवार, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, अनिरुद्ध सिसोदे, गौरव पाटील,सारंग साळुंके यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून मंगेश चव्हाण यांचा निषेध करण्यात आला.