रक्षाताई खडसे दहाव्या फेरीअखेर 361745 मतांनी आघाडीवर

raksha khadse

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे या दहाव्या फेरीअखेर 361745 मतांनी आघाडीवर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्या भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप व मित्रपक्षांच्या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर राष्ट्रवादीने येथे उमेदवारी देण्यासाठी बराच काथ्याकुट केला. अखेर अगदी निर्णायक टप्प्यात हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येऊन येथून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे महायुतीच्या रक्षाताई खडसे तर महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत झाली. दरम्यान, आज सकाळी जळगाव येथील शासकीय गोदाम परिसरात मतमोजणी सुरू झाली. यात पहिल्या फेरीअखेर महायुतीच्या रक्षाताई खडसे यांनी 361745 मते मिळाली आहे. तर डॉ. उल्हास पाटील यांना अवघी 196848 मत मिळाली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/425342491350913/

Add Comment

Protected Content