रक्षाताई खडसे २३ व्या फेरीअखेर 331856 मतांनी आघाडीवर

images 4

 

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे या १२ व्या फेरीअखेर 649885 मते मिळाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचा लीड वाढून आता 331856 वर पोहचला आहे.

 

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्या भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप व मित्रपक्षांच्या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर राष्ट्रवादीने येथे उमेदवारी देण्यासाठी बराच काथ्याकुट केला. अखेर अगदी निर्णायक टप्प्यात हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येऊन येथून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे महायुतीच्या रक्षाताई खडसे तर महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत झाली. दरम्यान, आज सकाळी जळगाव येथील शासकीय गोदाम परिसरात मतमोजणी सुरू झाली. यात १२ व्या फेरीअखेर महायुतीच्या रक्षाताई खडसे यांनी 649885 मते मिळाली असून तर डॉ. उल्हास पाटील यांना अवघी 318029 मतं मिळाली आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1279387518904746/

Add Comment

Protected Content