Home Cities जळगाव यंदा रक्षाबंधन विशेष मोदी, ममता, पबजी राखींचा ट्रेंड !

यंदा रक्षाबंधन विशेष मोदी, ममता, पबजी राखींचा ट्रेंड !

0
26

rakhi

 

जळगाव प्रतिनिधी । भाऊ-बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षांबधन. उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन सोबतच येत असून, या दिवसाच्या खरेदीसाठी बाजारपेठात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

याबाबत माहिती अशी की, राखी व गिफ्ट खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. सध्या रक्षाबंधनासाठी बाजारात पबजी, मोदी, ममता आणि फेसबुक राखीचा ट्रेंड सुरु आहे. याशिवाय, व्हॉट्सअॅप राखी, सोने-चांदी व हिरेजडीत राखी, बी-बियाणे राखी, लाइट सिनर राखी, म्युझिक राखी, तिरंगा राखी, डोरेमॅन राखी, मोटू पतलू राखी, पॅडमॅन राखी, अवेन्जर राखी, अँग्री बर्ड राखी, छोटा भीम, कृष्णा राखी, गणपती राखी, चांदीची राखी, रुद्राक्ष राखी यांसारख्या विविध राख्या बाजारात दाखल झाल्या असून त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.


Protected Content

Play sound