![rakhatai khadse rakhatai khadse](https://livetrends.news/wp-content/uploads/2019/04/rakhatai-khadse-300x200.jpg)
निंबोळा ता. नांदुरा (वार्ताहर) येथे श्री क्षेत्र निंबादेवीचे मनोभावे दर्शन करून भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांनी आशिर्वाद घेतले. याप्रसंगी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रावेर लोकसभा क्षेत्रात रक्षाताईना 5 लाखाहून अधिक मताधिक्य मिळावे यासाठी देवीकडे मागणे मागितले.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
याप्रसंगी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना.आ.चैनसुखजी संचेती, बुलढाणा जिप सभापती श्वेताताई महाले, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत, रक्षाताई खडसे यांनी सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.