जळगाव पोलीस अधीक्षकांकडून राकेशसिंग परदेशी सन्मानित

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते १५ जून शनिवार रोजी प्रशंसापत्र व २०००/- रुपये रिवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

पहूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक २०१९ भारतीय दंड विधान कलम ३०२ या कठीण किचकट अशा गुन्ह्याचा उत्कृष्ट कौशल्यपूर्ण तांत्रिक गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करून गुन्ह्याचा तपास करून पुरावे युक्त असे दोषारोप पत्र पाठवून आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व तीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली आहे . यापूर्वीही मागील वर्षी गोद्री खून प्रकरणातील आरोपीस दहा वर्ष शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड अशी कारावासाच्या शिक्षेबद्दल माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी . शेखर यांनी प्रशासकीय पत्र व रिवाड देऊन गौरविले होते. राकेशसिंग परदेशी यांना पहूर पोलीस ठाणे येथील दुसऱ्या खुणाच्या गुन्ह्याच्या शाबिती करिता आज पुन्हा पोलीस दलातर्फे गौरविण्यात आले आहे. या प्रशंसनीय कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला .सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी हे दिंडोरी येथे कार्यरत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Protected Content