चोपडा प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद विद्यालयात राज्यस्तरीय इंग्लिश मॅरेथॉन परीक्षेत इयत्ता पहिलीतील लावण्या चौधरी तर इयत्ता सहावीतील निखिल पाटील या दोघांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
त्यांना धुळे येथील कार्यक्रमात इंग्लिश मॅरेथॉन या स्पर्धेचे प्रमुख मा. सचिन इनामदार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व प्रत्येकी एक हजार रुपयांचा चेक देऊन गौरवण्यात आले. स्पेलिंग व इंग्रजी ग्रामर यावर आधारित असलेली बहुपर्यायी उत्तरांची ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. विवेकानंद विद्यालयानेच या परीक्षेच्या आयोजनाची सुरुवात केलेली असून परीक्षेसाठी विद्यालयातील उपशिक्षक संदीप कुलकर्णी, हेमराज पाटील, प्रसाद वैद्य, पूनम वैद्य, विद्या सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, रंजना दंडगव्हाळ, विश्वस्त मंडळ, शिक्षक वृंद व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.