राजूमामाच जळगावचे ‘किंग’; विजयाची शानदार हॅटट्रीक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून तब्बल ८७ हजार ५०३ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळून आमदारकीची हॅटट्रीक केली आहे. त्यांना एकुण १ लाख ५१ हजार ५३६ मते मिळून त्यांचा दणदणती विजय मिळविला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीच्या उबाठाचे उमेदवार माजी महापौर जयश्री महाजन, अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, वंचितचे ललित कुमार घोगले, अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर डॉ.आश्विन सोनवणे यासह इतर उमेदवार पराभूत झाले आहे.

जळगाव विधानसभा मतदारसंघात यंदा आमदार राजूमामा भोळे यांच्या विरूध्द लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक होते. बंडखोरांना तिलांजली देत तिसऱ्यांदा आमदार राजूमामा भोळे यांना भाजपाने उमेदवारी दिली. यामुळे भाजपमधून बंडखोरी करत माजी उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे आणि माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे शिवसेना-उबाठातून माजी महापौर जयश्री महाजन यांना तिकिट मिळाल्याने बंडखोरी करत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील मैदानात उतरल्यामुळे ही निवडणूक बहुरंगी ठरली होती. जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या काळात सर्व उमेदवारांनी एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.

शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत जळगाव शहर मतदार संघाच्या मतमोजणीत १९ फेऱ्यांमध्ये भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. १९व्या फेरीच्या अखेरीस आमदार राजूमामा भोळे यांनी ८७ हजार ५०३ इतक्या फरकाच्या मतांनी दणदणीत विजय मिळाविला आहे. यात आमदार राजूमामा भोळे यांना एकुण १ लाख ५१ हजार ५३६ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे ठाकरे गटाच्या उमेदवार माजी महापौर जयश्री महाजन ६४ हजार ३३ मते मिळाली. अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर ६ हजार ९२० मते मिळाली, तर वंचितचे ललीत घोघले यांना ४ हजार १९१ मते, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना ३ हजार ३५ मते मिळाली, मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांना १ हजार ४७० मते मिळाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.

Protected Content