Home क्राईम पैशांच्या वादातून तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण

पैशांच्या वादातून तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण

0
130


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुझे डंपर तुला देतो, असे सांगून बोलविलेल्या लोकेश महाजन (वय 24, रा. खेडी ता जळगाव) यांना चार जणांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता जळगाव तालुक्यातील कडगाव येथे घडली. या प्रकरणी शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकेश महाजन याच्याशी एका जणाने संपर्क साधून ‘तुला तुझे डंपर देतो, तू मला २० हजार रुपये’ असे सांगून कडगाव येथे बोलविले. त्यानुसार महाजन हे त्यांच्या मित्रासह तेथे गेले. त्या वेळी एका जणाने तुला बंदुकीने उडवून देतो, अशी धमकी दिली. त्याविषयी त्याला समजवित असताना 4 जणांनी लोकेश महाजन यांना बेदम मारहाण केली.

या प्रकरणी त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि आलियार खान करीत आहेत.


Protected Content

Play sound