Home Cities भुसावळ राजूभाऊ सुर्यवंशी यांनी घेतली ना.आठवले यांची भेट

राजूभाऊ सुर्यवंशी यांनी घेतली ना.आठवले यांची भेट

4cf054a4 4802 431f 9461 334a4c339cf9
4cf054a4 4802 431f 9461 334a4c339cf9

4cf054a4 4802 431f 9461 334a4c339cf9

भुसावळ (प्रतिनिधी) रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सुर्यवंशी यांनी नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी यांनी खा. आठवले यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी राजूभाऊ सुर्यवंशी यांनी राज्यमंत्री आठवले यांच्याशी बोलताना जळगाव जिल्ह्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘गाव तेथे रिपाइं’ पक्षाच्या शाखा असल्याचे आठवले यांना सांगितले. तसेच पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री आठवले यांनी सूर्यवंशी यांच्या कार्याचा गौरव करुन माझा सदैव आपल्याला पाठिंबा राहील, तूम्ही एकजूट राहून पक्षासाठी काम करून जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध रहा, असे सांगितले.


Protected Content

Play sound