Home धर्म-समाज मुक्ताईनगरात राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव उत्साहात 

मुक्ताईनगरात राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव उत्साहात 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सव सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवर्तन चौकात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले असून, शिवरायांच्या घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या थोर मातृशक्तीच्या स्मृतींना मानाचा मुजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनीताई पाटील, सुपुत्र हर्षराज पाटील यांच्यासह मराठा समाज तालुकाध्यक्ष अनंतराव देशमुख, वसंत पाटील सर, दिनेश कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक गणेश टोंगे, संतोष कोळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत कार्यक्रमास विशेष शोभा आणली.

कार्यक्रमादरम्यान प्रफुल्ल पाटील, राजेश वानखेडे, रऊफ खान, के. डी. पाटील, बाळासाहेब पाटील, राजू कापसे, वैभव पाटील, पांडू पाटील, अशोक सोनवणे, कृष्णा पाटील, मुरली पवार, मनोज मराठे, किरण महाजन, मोतीलाल जोगी, मुकेश महल्ले, संतोष मराठे, संदीप जोगी, राजेश चौधरी, अमोल वैद्य, निलेश मेढे, आतिक खान, प्रणित काठोके, गणेश पाटील, राजेंद्र वंजारी, धनराज सापधरे यांच्यासह असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली. नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा, त्यागाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणीत असलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केला. समाजाला दिशा देणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत जिजाऊ मातांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहनही करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound