पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथे नूतन शिक्षण संस्था संचलित बद्रिनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती हर्षोल्हासात साजरा करण्यात आली.
प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष उमेशचंद्र विलास वैद्य यांच्या हस्ते तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा स्वामी विवेकानंद व स्वराज्याच्या मार्गदर्शक राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर मुख्याध्यापक मनोज चौधरी यांनीही प्रतिमा पूजन केले. नंतर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अध्यक्ष उमेशचंद्र वैद्य यांनी मार्गदर्शन पर माहिती दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक धर्मेश चौधरी, मदतनिस चंदू लोकाक्षी, नथ्थू पाटील आदींनी परिश्रम घेतला.