राजीव गांधी नगरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । राजीव गांधी नगर परिसरातून नोकरदाराची ४५ हजार रूपयांची मोटारसायकल अज्ञात भामट्यांनी रात्री चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, उमेश मधुकर शिंपी (वय-४८) रा. शिवकॉलनी जळगाव हे खासगी नोकरी करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ डीए ९७५०) क्रमांकाची मोटारसायकल आहे. त्यांनी दुचाकी त्यांच्या मित्र दिलीपसिंग परदेशी रा. राजीव गांधी नगर हरीविठ्ठल नगर रोडे यांना वापरण्यासाठी दिली होती. १० जून रोजी रात्री ९ ते १०.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरून नेली. परिसरात शोधूनही मोटारसायकल सापडली नाही. उमेश शिंपी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.

 

Protected Content