चाळीसगाव प्रतिनिधी । मन्याड धरणाची उंची वाढविण्यासह विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांची आज माजी आमदार राजीव देशमुख यांनी भेट घेऊन त्यांना पाठींबा व्यक्त केला.
याबाबत वृत्त असे की, मन्याड धरणाची उंची वाढवुन प्रलंबीत असलेली नारपार योजना मार्गी लावावी यासाठी वेळोवेळी संबंधीत २२ खेड्यातील शेतकरी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. यात तमगव्हाणचे माजी सरपंच किशोर पाटील, जगदीश पाटील, धनराज पाटील, निलेश पाटील, मुकुंदा पाटील, राजेंद्र पाटील, माळशेवगेचे दिपक पाटील, सिताराम पाटील, संदीप पाटील, शेवरीचे जितेंद्र चौधरी, देवळीचे छगन जाधव, तांबोळेचे डी.ओ.पाटील, संजय पाटील यांच्यासह २२ खेड्यातील शेतकरी व ग्रामस्थांचा सहभाग होता.
आज सकाळी माजी आमदार राजीव देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठींबा व्यक्त केला. यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. याप्रसंगी राजीवदादा देशमुख यांच्यासह दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश पाटील, रामचंद्र जाधव, भगवानसींग पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.