Home Cities जामनेर कसबा पिंपरीत राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे राजेंद्र पाटील समर्थकांसह भाजपात

कसबा पिंपरीत राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे राजेंद्र पाटील समर्थकांसह भाजपात


जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला असतानाच जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथे एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच राजेंद्र पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजपा) अधिकृत प्रवेश केला असून, यामुळे तालुक्यात भाजपा अधिक बळकट झाली आहे.

फत्तेपुर येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते भाजपा परिवारात सहभागी झाले. भाजपा नेत्यांवर दाखविलेला विश्वास आणि मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व हे या पक्षप्रवेशाचे प्रमुख कारण असल्याचे यावेळी बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला भाजपा जळगावचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते जे. के. चव्हाण, संजय दादा गरुड, माजी मंडळ अध्यक्ष मयूर पाटील, बबलू भंसाली, आबा पाटील, एकनाथ लोखंडे, संजय चौधरी, विलास राजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे जामनेर तालुक्यात भाजपाची घडी अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट होत असून, येत्या स्थानिक निवडणुकांवर या घडामोडीचा निश्चितच परिणाम जाणवेल. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून दुसरीकडे भाजपाने तालुका स्तरावर संघटनात्मक बळ वाढवले आहे.


Protected Content

Play sound