Home Cities जळगाव भाजपच्या जिल्हा माजी सैनिक सेल अध्यक्षपदी राजेंद्र मराठे यांची नियुक्ती

भाजपच्या जिल्हा माजी सैनिक सेल अध्यक्षपदी राजेंद्र मराठे यांची नियुक्ती


जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी महानगर जिल्ह्याच्या वतीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नवनवीन नियुक्त्यांवर भर दिला जात आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून जळगाव येथील सक्रिय कार्यकर्ते राजेंद्र दगडू मराठे यांची भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा माजी सैनिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नियुक्ती पत्राद्वारे या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे.

सदर नियुक्ती राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, तसेच आमदार राजुमामा भोळे आणि मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. राजेंद्र मराठे यांनी आतापर्यंत पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून त्यांच्या याच संघटनात्मक कामाची पावती म्हणून पक्षाने त्यांच्याकडे ही नवीन धुरा सोपवली आहे.

राष्ट्र प्रथम आणि अंत्योदय या भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून, पक्ष शिस्त व संघ भावनेचे पालन करत ते भविष्यात माजी सैनिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली आहे. सरकार आणि जनता यामधील दुवा बनून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठे यांनी कटिबद्ध राहावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. या निवडीबद्दल राजेंद्र मराठे यांचे राजकीय व सामाजिक स्तरातून अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound