राज ठाकरे झाले आजोबा !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आजोबा झाल्याची बातमी आताच समोर आली आहे. राज ठाकरेंचे सुपुत्र मिताली-अमित ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने ठाकरे परिवारात उत्सवाचं वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे आता राज ठाकरे यांच्यावर ‘आजोबा’ अशी नवी जबाबदारी असणार आहे. शिवतीर्थावरावर नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुंबईतच राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, कारण मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 साली लग्न झाले होते. त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. या लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. आता अमित ठाकरे यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांना आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

 

 

 

Protected Content