मुंबई (वृत्तसंस्था) कथित कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यालयाबाहेर आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.
ऐनवेळी विरोध प्रदर्शन केले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मनसेचे संदीप देशपांडे यांच्यासह विविध भागातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर संभाव्य हिंसक घटना लक्षात घेता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लावले ध्वनीक्षेपक आहेत. एवढेच नव्हे तर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेस्ट बसेसनाही जाळ्या लावण्यात आल्या आहेत. राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांचे कुटुंबीय ग्रँड हयात हॉटेलमध्ये थांबले आहे. राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, पुत्र अमित आणि सून मिताली ठाकरेही आले होते.