रावेर (प्रतिनिधी) तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला होता. या वादळी वाऱ्यामुळे रोझोद्यात घराचे पत्रे उडाले तर केळीचे किरकोळ नुकसान झाल्याचे वृत्त आहे. याची माहिती प्रशासकीय अधिका-यांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
तालुक्यातील सावखेडा, विवरे, खिरोदा, चिनावल, भाटखेडा, उटखेडा, खिरोदा या भागात दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वा-याला सुरुवात झाली त्यानंतर काही वेळातच लगेच पावसाला सुरुवात झाली. यामुळे केळीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. खिरोदा मंडळात ५.२ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली असुन या नुकसान झालेल्या भागाची कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी पाहणी केली आहे.
वादळाने ट्रॉली उलटली; घराचे पत्रेही उडाले:- तालुक्यातील उटखेडा चिनावल परिसरात वादळाचा जोरदार फटका बसला आहे. यामुळे रोझोदा येथे घराचे पत्रे उडाले तर शेती-शिवार भागात केळीचे नुकसान झाले आहे. वादळ इतके जोरात होते की, गाड रस्त्याने जाणारी ट्रॉलीही त्यामुळे उलटली.