जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या जळगावकरांना पावसाने आज तुरळक बरसत काही प्रमाणात दिलासा दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून जळगावकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. उन्हाचा कडाका काही प्रमाणात कमी व्हावा; यासाठी पावसाच्या सरी बरसणं गरजेचं होतं.
आज शहरातील काही भागात पावसाच्या जलधारा बरसल्या. मुसळधार पावसाची अपेक्षा असतांना काही ठिकाणी पाऊस तुरळक प्रमाणात बरसल्याने जळगावकरांचा हिरमोड झाला; तरीही पहिला पाऊस असल्यामुळे चिमुकल्यांनी या पावसात भिजत, पहिल्या पावसाचा आनंद घेत त्याचं स्वागत केलं.