जळगाव प्रतिनिधी । आज रात्री जोरदार सरींसह पावसाने शहरासह जिल्ह्यातील बर्यात ठिकाणी हजेरी लावल्याने उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मृग नक्षत्र लागून काही दिवस झाले तरी कुठेही जोरदार पाऊस झाला नाही. या पार्श्वभूमिवर, आज रात्री साडेनऊच्या सुमारास शहरात पावसाचे आगमन झाले. गत अनेक दिवसांपासून वाढीव तापमानामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. यामुळे जलधारा कोसळल्यामुळे तात्पुरता की होईना उकाड्यापासून मुक्तता झाल्याचे जाणवत आहे. तर जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.