रेल्वे वार्ड परिसरातील समस्यांबाबत भारिप महासंघाचे निवेदन

bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे वार्ड परिसरात मुलभूत सुविधा नसल्याने रहिवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणीसाठी भारिप महासंघाने मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

शहरातील रेल्वे उत्तर वार्ड विभागात रस्ते, नाला स्वच्छता, घंटागाड्या व नुकतेच अमृत योजनेसाठी केलेल्या खड्ड्यामुळे पावसाळ्यात चिखल झाला असून नागरीकांना चालणे देखील कठीण झाले आहे. यासह मुलभूत सुविधा नसल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. भुसावळ नगरपालिकेच्या माध्यमातून होणारे गैरसोय दुर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने देण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

Protected Content