भुसावळ (प्रतिनिधी) मुंबई झालेल्या जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला असुन रेल्वेचे कोलमडले आहे. त्यामुळे आज येथील रेल्वे स्थानकावर त्यामुळे प्रवाश्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि त्यांनी स्टेशनवर मोठा गदारोळ केला.
येथील रेल्वे स्थानकावर ‘गोदान’ ‘महानगरी’ व ‘पुष्पक’ एक्सप्रेस गेल्या कित्येक तासांपासून थांबवण्यात आलेल्या आहेत. आज दुपारी या तिनही गाड्यांमधील प्रवासी संतप्त झाले. मुंबईकडे नेमकी कुठली गाडी सोडणार ? या मुद्यावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी स्टेशनवर गदारोळ सुरु केला. गाडीतील प्रवासी रेल्वे रुळांवर येवून बसले आणि एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर त्यांना हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. त्यासाठी त्यांना रेल्वे पोलीस बलाचीही मदत घ्यावी लागली.