जळगाव रेल्वे स्थानकावर तरूणाचा आकस्मात मृत्यू

railway tarun

जळगाव प्रतिनिधी । आजारी असल्याने गावाकडे जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर झोपलेल्या अनोळखी तरूणाचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. याबाबत रेल्वे पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या मयत तरूणाची ओळख पटली असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

सईद शेख मुक्तार शेख (वय-26) रा. शवर नगर, जालना हा हमालीचे काम करतो. सतत आजारी असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यात राहणारा भाचा हमीद सलिम शेख यांच्याकडे गेला. त्यानंतर त्याने उपचार घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी 4 वाजता रेल्वेत जालना जाण्यासाठी निघाला. दरम्यान जळगाव रेल्वे स्थानकावर रात्री 10 वाजेच्या सुमारास उतरल्यानंतर आजारी असल्याने झोपला. मात्र झोपेतच सईद शेखचा आकस्मात मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलीसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणला. आज सकाळी खिश्यात असलेल्या आरोग्य सेवा नोंदणी कार्डच्या माध्यमातून ओळख पटली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, बहिण आणि तीन मुली असा परीवार आहे. याबाबत रेल्वे पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content